मनात कायम राहीलेली करोनाची भिती ! my fight with corona!!!
करोनातून बरा होऊन हॉस्पिटलमधन घरी परत आलो त्याला ०२जानेवारी २०२२ला १वर्ष ५ महिने पूर्ण झाले.
. मी आता ठणठणीत बरा झालोय , काम पण ok ok चालू आहे, मी प्लाझ्मा-दान पण केलं .लस पण घेतली!
हॉस्पिटलमध्ये भरपूर इंजेक्शनं आणि असंख्य वेळा सुया टोचून घेऊन काळेनिळे पडलेले माझे हात आता पूर्ववत झालेत.
पण आजूबाजूची करोनाची भीती काही अजूनही कमी होत नाही आहे. एकापेक्षा एक सरस असे लॉक डाऊन क्रमशः सुरूच आहेत. रोज ओळखीचे कोणतरी गेलं ही बातमी गेले काही दिवस सवयीची झाली आहे. आपण सर्व घाबरलोय इतके की कदाचीत यातून सावरू का नाही ही शंका सतत अस्वस्थ करते आहे.
म्हणूनच माझे पूर्वीचे अनुभव परत एकदा एकत्र करून संपादित करून शेअर करतोय....
काळजी घ्या आणि छान मस्त पैकी जगा, जे पटेल तेवढंच घ्या! धीट बना, हेच परत परत सांगायचंय!
:
--------------------
♡ माणसांनी माणसाला जगवण्याची अफलातून जिद्द ♡
भाग १♡
२ सप्टेंबर २०२० ला एक महीना झाला घरी परत येऊन! ! एक वेगळा अनुभव म्हणून हे लिहून ठेवावेसे वाटतय.
१६ जुलै २०२०..... माझ्या आँक्सिजन लेव्हलस् (पातळी) एकदम खाली आल्या म्हणून मला रूबी हाॅस्पिटल ,(पुणे) मध्ये दाखल केले गेले. आँक्सिजन वर ठेवून मी अतिशय क्रिटीकल(अत्यंत आजारी )आहे असा निरोप घरच्यांना देण्यात आला. आणि माझी ट्रिटमेंट सुरू झाली , तब्बल पुढचे १८ हो, आठरा दिवस मी रूबी हाॅस्पिटल मध्ये होतो.
ही त्या एका अचानक करायला लागलेल्या अनादी अकल्पित प्रवासाची गोष्ट आहे..इति पासून अथ ची गोष्ट ......... माझ्या करोनाला हारवल्याची गोष्ट !
ही ; मी, माझ्या घराच्यांची ,जिवलगांची , हाॅस्पिटल मधल्या डाॅक्टर्स, सिस्टर्स ,स्टाफ ; या आमच्या सगळ्यांच्या लढाईची आणि ..... अर्थातच माझ्या बरोबरच्या इतर सर्वांच्या प्रचंड धडपडीची कहाणी, माणसाला माणसांनी जगवण्याच्या अफलातून जिद्दीची गोष्ट!
पुढच्या काही मिनीटात मी ही करोनाशी दिलेल्या लढ्याची गोष्ट क्रमशः सांगणार आहे. अनेक दिसणारे , ऐकले जाणारे समज गैरसमज दूर करण्यासाठी याची मदत व्हावी म्हणून. .....
शेवटी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे , हो ना.
तरीही आधीच काही मुद्द्यांवर मुद्दाम आधी बोलतो
माझ्या जीवलग मित्रांनो आणि मैत्रीणींनो, तुम्ही मला माझ्या खूप जवळचे आहात . कोणी तरी गेले आणि कुणाला करोना झाला यामुळे घाबरून जाऊ नका. भित्यापाठी ब्रम्हराक्षस ही म्हण लक्षात ठेवा . माझी लढाई लक्षात ठेवा , मी बरा झालोय. एवढेच लक्षात ठेवा. घाबरून जाऊ नका.
मात्र काळजी नक्की घ्या, आयुर्वेद, होमिओपॅथी यांची preventive औषध घ्या, पथ्य पाळा. उगाच भटकू नका. गर्दीत जाऊ नका . keep social distance . तसेच ब्लडप्रेशर, डायबेटिस , ऑक्सिजन पातळीवर सतत लक्ष ठेवा. Always remember "prevention is better than cure" ॥
. काही महत्वाच्या सुचना स्वानुभवावरून देतोय, ह्या लक्षणांकडे आजिबात दूर्लक्ष करून चालणार नाही आहे.
1. वास येण बंद होते
2. चव जाते.
3. दम लागतो
4. जिने चढणे नकोसे होते
5. ताप , खोकला, सर्दी होते
6. कणकण जाणवते
7. अशा वरच्या लक्षणांची कोणतीही व्यक्ती च्या संपर्कात येणे टाळा.
आणि हो, कुणाला मोबाईल वरून फोन केल्यावर जी सूचना देण्यात येत होती ती तंतोतंत लागू पडते , त्याच्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
हे समजून घेत गैरसमज दूर करा. करोना बरा होतो. घाबरून जाऊ नका. STAY SAFE
आणखी बरेच लिहायचे आहे. .... ते भाग २ मध्ये
क्रमशः
♡ माणसांनी माणसाला जगवण्याची अफलातून जिद्द ♡
भाग २♡
पहील्या भागाला दिलेल्या प्रतिसाद आणि प्रोत्साहन या दोन्ही गोष्टींबद्दल शतशः धन्यवाद. सुरवातीलाच एक गंमत सांगतो, हाॅस्पिटल मधून घरी आल्यावर सध्या मला बरेचजण ओळखत नाहीत का माहितेय का? अहो , माझे वजन चक्क २५/३० किलोंनी (Kgs.) कमी झालं म्हणून! गोड खाणे सोडून दिले त्याचा इफेक्ट ; दुसरं काय?
आता मी क्रमशः असलेली माझी मागची गोष्ट परत पुढे नेत आहे ...
मी काय किंवा कोणीही करोना का काय ते काही मायक्रोस्कोपखाली पाहिलेलं नाही. न दिसलेल्या पण अनुभव घेतलेला हा करोना Covid तसा अतीशय वाईट आजार. आपल्याला होणार नाही असे ज्यांना वाटते त्यांना तर तो व्हायचे चान्सेस जास्तच ! माझं तेच तर झाल की, Anyways now I am out of it after a good fight; but I have seen death around me dancing and picking up victims. हो , मृत्यू दर कमी होत आहे तरी मृत्यू होत आहेत ही वास्तुस्थिती आहे, आणि मी ही मरणांची लढाई खूप जवळून पाहीली त्या हॉस्पिटलमधल्या १८ दिवसात.
या पार्श्र्वभूमी वर तुमच सगळ्यांच आणि Corona warriors च मला मनापासून कौतुक वाटते . आपल्या प्राणाची पर्वा न करता हे सर्व डाॅक्टर्स, नर्सेस , वाॅर्डमधले सेवक वर्ग, ज्या पद्धतीने करोना रुग्णांना बर करत आहेत ते मी जवळून पाहिले आहे. खरोखर धन्य आहेत हे सगळे.
पण आता मागे वळून बघताना, ते रुबी हाॅस्पिटल मधले १८ दिवस स्वच्छ आठवताहेत. तोपर्यंत न ऐकलेल्या अनेक वैद्यकीय संज्ञा माझ्या भोवती फेर धरून नाचत होत्या ....ऑक्झीमीटर, कॅथेटर, व्हेंटीलेटर , आय. सी. यू , बाय पॅप , वेगवेगळी इंजेक्शन्स, व्हीटामीन्सच्या गोळ्या, सलाईनमधून दिली जाणारी औषध. हे कमीच होत की काय म्हणून माझ टेस्ट साठी रोज पहाटे पहाटे काढले जाणार रक्त, नर्सेसना न मिळणार्या माझ्या व्हेन्स्......त्यापाई दहा -बारा वेळा खुपसल्या जाणाऱ्या सुया ...... यात भरीस भर म्हणून दिले जाणारे अन्न माझ्यासाठी भयानक तिखट . ....एक ना अनेक अशा आठवणी. ...आजही शहारे येतात अंगावर त्या आठवणीने.....
आयुष्यात कधीही एकटा न राहिलेला मी एकटेपणा भोगत होतो.... शत्रूवरही अशी वेळ येऊ नये! एकांत आणि एकटेपणा यात जमीन अस्मानाचा फरक आहे . खूप काही शिकवून गेला हा एकटेपणा.
रोज रात्री आमची १५ वर्षांची मुलगी गाया whatsapp video call करायची , त्याची मी दिवसभर वाट बघत असायचो..... त्या काॅलवर मग मी घरच्यांशी आणि कधीकधी माझ्या मित्र मैत्रीणींशी बोलायचो..... तेव्हा थकवा पळून जायचा.
आणखीन जगावसं वाटायचे .
घरात विनीता आणि गाया आणि भावाच्या घरी तो (निखिल) आणि शलाका Self quarantine झाले होते हे मला खूप नंतर कळले. माझे मोठे दोन्ही भाऊ डाॅ. अजित रानडे आणि नितीन सोनटक्के आणि माझी बहीण आणि मेहुणा गौरी आणि घनःश्याम देव हे सगळे खूप धडपडत होते. . .... प्रचंड कष्ट आणि मानसिक दडपण सोसलय माझ्यासाठी या सगळ्यांनी. मी हाॅस्पिटल मध्ये आणि ते बाहेर..... खरच एक व्यस्त प्रमाण . त्यांना आलेल्या दडपणाची फक्त कल्पना करू शकतो आपण.
मला जगवण्याची त्यांची अफलातून जिद्द कामी आली ....
तसेच अनेक ओळखीच्या तसेच अनोळखी मैत्रांनी केलेल्या प्रार्थना ....त्या सगळ्यांचेच आशिर्वाद ; यांचा नक्कीच उपयोग झाला .... मी पूर्णपणे बरा झालोय आता .
ऑक्सिजनच प्रमाण कमी होत होते म्हणून मी रुबी हाॅस्पिटल मध्ये दाखल केला गेलो . जोशी हाॅस्पिटल ते रुबी हाॅस्पिटल हा प्रवास कोव्हीड अँम्बुलन्सनी झाला तो चक्क स्ट्रेचर अँम्बुलन्सच्या दोन बाकांच्या मध्ये ठेवून, टणाटण उडत मी रूबी हाॅस्पिटल मध्ये पोचलो. तिथे गेल्यावर डायरेक्ट अतिशय क्रिटीकल विभागात मला अॅडमिट केल.
ईथेच माझा एकटा प्रवास सुरू झाला. कळतय पण वळत नाही अशी परिस्थिती होती. काहीही झाले तरी कॅथेटर, व्हेंटीलेटर आणि घशात अन्न भरवायची नळी लावून घेणार नाही हे मी सारखे घोकत होतो , कदाचित त्याचाच परिणाम म्हणून बाय पॅप सारखा लावून ठेवला होता. २०/३० च्या स्पीडने, ऑक्सिजन तो बाय पॅप सारखा आत नाकात घूसवत होता, एखाद्या सायकलच्या टायर्समधे हवा भरतात सेम तसं. दर दोन तासांनी काही वेळच बाय पॅप काढला जायचा; तेव्हा मात्र खूप हलके वाटत असे. असे निदान १५/१६ दिवस रोज चालूच होते.
आता घरी आल्यावर मी किती नशीबवान आहे ते समजतय. अजून बरेच काही सांगायचे आहे पण ते पुढच्या भागात लिहतो....तोवर काळजी घ्या.
STAY SAFE
क्रमशः
♡ माणसांनी माणसाला जगवण्याची अफलातून जिद्द♡
भाग ३♡
पहील्या दोन्ही भागाला दिलेल्या प्रतिसाद आणि प्रोत्साहन या दोन्ही गोष्टींबद्दल शतशः धन्यवाद.
आता मी क्रमशः असलेली माझी मागची गोष्ट थोडीशी पुढे नेत आहे ...
घरी परत येऊन आता १० महिने झाले....
हो , ती अनेक मरणांची लढाई खूप जवळून पाहीली मी त्या १८ दिवसात. अजूनही रोज कुठे तरी माहीतीतले २-३ लोक करोनाशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने गेल्याच कानावर येत असतच आणि आता घरी आल्यावर मी किती नशीबवान आहे ते ही समजतय.
पण माझ्या लक्षात राहीलाय तो आयुष्यात कधीही न भोगलेला एकटेपणा , तो ही आठरा दिवस!.... नंतर कळलेल्या भरमसाठ बिलाच्या रकमा ...... पुढचे अनेक दिवस जवळच्या इतरांच्या मनात कायम राहीलेली करोनाची भिती ! भेटायला यायची इच्छा असूनही भेटायला न येणारे मैत्र ; तुला करोना परत होऊ शकतो असे छातीठोकपणे सांगत असलेले तथाकथित सल्लागार ; हे सगळच मला तरी अनाकलनीय!
या सगळ्या पार्श्र्वभूमी वर मला अत्यंत कौतुक वाटले ते माझ्यासाठी प्रचंड कष्ट आणि मानसिक दडपण सोसणारे माझ्या जवळचे नातेवाईक, मित्र आणि मला बरं करण्यासाठी जीवाच रान करणारे हाॅस्पिटल मधले डाॅक्टर्स, नर्सेस, वाॅर्डमधल्या सेवक वर्गाच आणि माझ्यासाठी प्रार्थना करणार्या ओळखीच्या आणि अनोळखी हितचिंतकांच!!.
तसेच घरात माझ करता करता स्वतःच्या प्रकृती कडे दुर्लक्ष करीत माझ्या बरोबर खंबीर उभी राहिलेली माझी सुविद्य पत्नी विनीता . लहानपणीच एकदम प्रगल्भ झालेली आमची मुलगी गाया ; .
...आणि
माझ्या साठी १६ जुलै पासून रोज १०० वेळा १०० दिवस रोज हनुमान चालिसा म्हणणारा माझा पाठचा भाऊ निखिल रानडे आणि वहिनी शलाका. ; कणभरही कल्पना न देता हाॅस्पिटलची जबाबदारी घेणारे माझे दोन्ही मोठे भाऊ , नितीन सोनटक्के आणि डॉ. अजित रानडे कायम भक्कम पाठिंबा देणारे बहीण -मेहुणे गौरी आणि घनःश्याम देव आणि माझ्या सासरचे मंडपे कुटुंबीय.
याच्याच जोडीनं, मी घरी आल्यावर माझ्या मागे सतत भक्कमपणे उभं राहणारा अनंत बाम सारखा दोस्त!! आणि गेले दहा महिने कामाचा व्याप कायम ठेवणारे माझे clients , मला जगवण्याची परत उभ करायची त्यांची अफलातून जिद्द ...त्या सगळ्यांचेच आशिर्वाद ; यांचा नक्कीच उपयोग झालाच .... आणि आता मी ठणठणीत बरा झालोय . मला जगवण्याची या सगळ्यांची ही अफलातून जिद्द कामी आली .... हे आज पदोपदी जाणवतय. या करोना लढवय्यांचा मला जाज्वल्य अभिमान आहे . शेवटी Every cloud has a silver lining हेच तत्व महत्वाचे .
तसेच माझे काही जवळचे आमचे Biznovators - बिझनोव्हेटर्स चे नवे जुने क्लायंटस् आणि माझ्या उद्योगशाळा उपक्रमात सहभागी तरूण उद्योजक तसेच आमचे डाॅ. KNC: किर्तीसिंह चौहान, रूबीचे डाॅ . देशमुख, डाॅ. सचीन पेठकर हे तिन्ही वेगवेगळ्या पॅथींचे मला सतत आधार देणारे हे तिन्ही डाॅक्टर्स; मित्रांपैकी टेकडीवर नेणारा मिलींद करमरकर; खूप काळजी घेणारे महेश आणि नंदीनी आठवले, कौस्तुभ उपासनी, सतत साथ देणारे अशोक अलूलकर , अमोघ उपाध्ये, समीर मर्ढेकर, परिक्षीत देवल, शंतनू वाघ, दिपक गोलांडे, मनीषा आणि विशाल देवकर ; प्लाझ्मा डोनेशन ला मदत करणारे यशवंत मोरे, तसेच केदार रानडे, कौस्तुभ काळे , दिलीप कोटीभास्कर, जयंत घाटे, संजय रूणवाल ह्या सारखे हितचिंतक आज माझ्या बरोबर आहेत ; आणि मी मात्र या सगळ्यांच्या मुळे " फिनिक्स " झालोय..... राखेतून परत अस्तित्वात आलोय.
हो , हे लिहताना काही जवळचे अज्ञाताकडे पुढे निघून गेलेत.
तसेच अनेक अव्यक्त सुह्रूदांची नाही लिहू शकलो . मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.
या सर्वांना मी विसरून कसे चालेल! या सगळ्यांत मी देव पाहीला आहे.
या माणसांची माझ्यासारख्या माणसाला जगवण्याची अफलातून जिद्द मला नतमस्तक करते.
मुद्दामून हे लिखाण केलय ते हेच सांगायला की करोना बरा होतो पण करोना रुग्णांना खरी गरज असते ती मानसिक आधाराची. समाजातील घाबरट , संधीसाधू मानसिकता आता मात्र खरच बदलायला हवी हेच माझे मागणे !!
या काळात अनेक बरे आणि वाईट अनुभव आले येत आहेत....... अजून बरेच काही सांगायचे आहे पण ते पुढच्या भागात दोन वर्ष पूर्ण होईल तेव्हा लिहतो....तोवर काळजी घ्या.
STAY SAFE
क्रमशः भाग ३
आजूबाजूची करोनाची भीती काही अजूनही कमी होत नाही आहे. म्हणूनच माझे पूर्वीचे अनुभव परत एकदा एकत्र करून संपादित करून शेअर करतोय.... करोनाचा बागुलबुवा आणि घाबरट लॉकडाऊन आता बास्स! जगू दे सगळ्यांना मोकळा श्वास घेऊन!
काळजी घ्या आणि छान मस्त पैकी जगा, हेच परत सांगायचंय!
तुमचा
हर्षवर्धन रानडे
9822798940/ 8888861767
Comments
Post a Comment