माझ्या एका वाक्याने उद्योजकता घडू शकते
मी परत तुमची ओळख आमच्या एका आम्ही घडवलेल्या उद्योजकाशी करून देणार आहे. हे आहेत धनंजय इंगळे तुमच्यापैकी अनेकांनी साताऱ्याहून पुण्याला जाताना किंवा येताना यांचा इंगळे कंदी पेढेवाले अशा बोर्ड नक्की पाहीला असेल. ते इंगळे कंदी पेढेवाले म्हणजे हेच!
यांचा उद्योग उभा करण्यात माझा छोटासा वाटा आहे मी जेव्हा यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही सातारचे आहात तर मग कंदी पेढे बनवायचा विचार का नाही करत? असंच विचारलं
काही दिवसाने धनंजय माझ्याकडे आले आम्ही सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी मला ते सातारा कंदी पेढ्यांचा कारखाना चालू करणार आहेत असं सांगितलं.
आज या गोष्टीला तीन चार वर्षे झाली. आज खूप दिवसांनी नंतर कोल्हापूरहून येताना मुद्दामून ठरवूनच धनंजयला भेटलो . दोन व्यवस्थित दिसतील अशी होर्डिंग्ज आणि हायवेला अगदी मोक्याच्या जागी उभा असलेलं दिमाखदार दुकान आणि तोच हसतमुख धनंजय! करोनाच्या लाँकडाउन नंतर तब्बल दीड वर्षांनी आम्ही भेटत होतो
धनंजयला भेटून खूप अभिमान वाटला , आता तो या उद्योगात व्यवस्थित स्वतःचे स्थान निर्माण करतोय.
ही पोस्ट मुद्दामून टाकली .
तुम्हाला सांगतो की आता सर्वकाही सुरळीत होतंय, तेव्हा माझ्या उद्योजक मित्रांनो तुम्ही "धनंजय म्हणजे आमचा सातारचा कंदीपेढे वाला" आणि "ऋषिकेश म्हणजे आमचा इंजिनियर वडेवाले वाला "अशा मी आमच्या बिझनोव्हेटर्स उद्योगशाळा प्रकल्पांतून घडवलेल्या या तरुण उद्योजकांचा आदर्श ठेवा.
स्वतः भरपूर शिकलेले असून ही मुलं आज प्रचंड कष्ट करत त्यांच्या नुसती पायावर उभी आहेत आणि आज ते उद्योगात स्वतःचं आदर्श स्थान निर्माण करत आहेत. निश्चितच त्यांच्यासाठी पुढचं भविष्य उज्वल असेल. तुम्ही यांचा आदर्श ठेवा आणि असंच तुमचं भविष्य उज्वल करा. घाबरू नका
जाता जाता एवढंच म्हणेन हम तुम्हारे आगे है , तुम भी आगे बढो, डरो नहीं हम साथ साथ है!
हर्षवर्धन रानडे
बिझनोव्हेटर्स उद्योगशाळा
पुणे
6/10/2021
Comments
Post a Comment